Thoughts of a Free Soul

Book  Reading

       पुस्तक वाचन :- शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसारामुळे आज समाजात लिहिता वाचता येणा-यांचे प्रमाण बरेच जास्त आहे. एकीकडे भारंभार पुस्तकं छापून आपलं उखळ पांढरं करून घेणा-यांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे लोकांची पुस्तक वाचनाची आवड कमी होत असल्याची तक्रारही जोरात चालू आहे.
       "वाढत्या शिक्षणप्रसारामुळे पुस्तकं वाचणा-यांची संख्या रोडावली" हे वाक्य चमत्कारिक वाटले तरी खरे आहे. पूर्वी सुशिक्षितांमधले बहुतेक जण आवर्जून पुस्तकं वाचायचे. समाजात निरक्षरांची संख्या जास्त असल्यामुळे लिहितावाचता येणारी मंडळी भाव खाऊन होती. आजकाल गल्लीबोळात साक्षरांचं प्रमाण वाढल्यामुळे "हल्ली काय कोणीही पुस्तकं वाचतो" असा दृष्टिकोन नकळत बळावला आहे. त्यामुळेही लोकांचा पुस्तक वाचनाचा उत्साह कमी झाला आहे. पूर्वी काखोटीला पुस्तकं मारून पाण्डित्याचे प्रदर्शन करणा-या बुद्धिजीवी मंडळींभोवती एक प्रकारचे वलय होते ते आज नाहीसे झाले आहे.
       तीस चाळीस वर्षांपूर्वी समाजात रिकामटेकडयांची संख्या जास्त होती. करण्यासारखं फारसं काही लोकांकडे नव्हतं. त्यामुळे पुस्तक वाचनात दिवसाचे तीन चार तास घालवणं शक्य व्हायचं. हल्ली लोकांकडे करण्यासारखं बरंच काही असतं. करमणुकीची इतरही अनेक साधनं असतात. त्यामुळे पुस्तक वाचनासाठी दिवसाकाठी अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत एखादं लांबलचक पुस्तक आठवडाभर वाचत बसायचं आणि नंतर ते पुस्तक रटाळ होतं असा निष्कर्ष काढायचा ह्यात नुसताच कालापव्यय होतो. निरर्थक पुस्तकं वाचत बसल्यामुळे राहणीमान (Standard of Living) कमी झाल्यासारकं वाटतं. हे सर्व टाळण्यासाठीच हा पुस्तक परिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. ह्यामुळे चोखंदळ वाचकांना पुस्तक हातात घेण्याआधीच त्या पुस्तकाच्या दर्जाबद्दल योग्य ती माहिती मिळू शकते.
       (खालील कोष्टकात दिलेला प्रत्येक पुस्तकाचा दर्जा निर्धारित करण्यासाठी वापरलेली पद्धत जाणण्यासाठी कोष्टकाच्या शेवटी दिलेल्या पुस्तक परिक्षण ह्या लिंकवर क्लिक करा.)


पुस्तकाचं नाव

अस्तित्व
काचकमळ
प्रतिबिंब
यशोवर्मन
अस्वस्थ नायक
लीली
निराधार
वंशवृक्ष
माणसाच्या गोष्टी-१
माणसाच्या गोष्टी-२
काळ बदलला आहे
नग आणि नमुने
जॉर्जेट
त्रिपदी
तर्जनी
आंधळ्याच्या गायी
लेखकाचं नाव

सुरेश वैद्य
डॉ. माधुरी शानभाग
रामचंद्र सडेकर
संजय सोनावणे
उत्तम कांबळे
सीताराम मेणजोगे
बाबा कदम
डॉ. एस.एल. भैरप्पा
रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी
अरूण हरकारे
शिवराज गोर्ले
माधव मनोहर
गो.नी.दांडेकर
यशवंत रांजणेकर
मेघना पेठे
दर्जा

१८%
३०%
३५%
२०%
१०%
१५%
१५%
२६%
१४%
२४%
१४%
२८%
२५%
१५%
३२%
३६%
वाचकाधार

३५%
२५%
२२%
१५%
१५%
१८%
१०%
३५%
२२%
२६%
२०%
३२%
२०%
३०%
१५%
२६%
Comments or Suggestions पुस्तक परिक्षण Home
Hosted by www.Geocities.ws

1