*रामपुरी येथे गोदावरी काठी 3000 बांबूची लागवड- महाश्रमदान मोहीम*
मानवत तालुक्यातील मौजे रामपुरी बु येथे जिल्हा परिषद परभणी च्या वतीने देण्यात आलेली 3000 बांबूच्या टिशू
कल्चर रोपांची लोकसहभागातून गोदावरी नदी काठावर लागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या बांबू
रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी रामपुरीतील युवक ग्रामस्थ, रामपुरी ग्रामपंचायत व वृक्षवल्ली फाउंडेशन यांनी घेतली आहे.
रविवार दि 11 जुलै 2021 जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून *तीन हजार बांबू वृक्षलागवड* गोदावरी
नदीच्या काठावर करण्यात आलेल्या महाश्रमदान अभियानामध्ये रामपुरी येथील सुमारे दीडशे गावकऱ्यांनी सक्रिय
सहभाग नोंदवला. महाश्रमदान मोहिमेमध्ये ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी,माधव यादव
सहाय्यक निबंधक सहकार सेलू , विस्तार अधिकारी इखे, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास
अधिकारी, भजनी मंडळ, ग्रामस्थ, युवक, वृक्षवल्ली फाउंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
****************** नदीच्या काठावर बांबू लागवड केल्यामुळे जमिनीची होणारी धूप कमी होणार असून बांबू लागवडीमुळे
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. सर्व गावांनी नदीकाठावर प्रामुख्याने बांबूची लागवड करावी.