|
|
|
नमस्कार मंडळी.
पावसामुळेच यावेळेस सदाफ़ुली जरा उशीराने फ़ुलत आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदा, शालीवाहन शक १९२७, युगाब्द ५१०७ म्हणजेच इंग्रजी दिनांक ६ ऑगस्ट २००५ हा या सदाफ़ुलीचा प्रसारणदिन आहे. या वेळेपासून 'युनिकोड पद्धती'मधे सदाफ़ुलीची बांधणी करण्याची सुरूवात करत आहोत. या अंकात सौ. अनघा दिघे, श्री. रविन्द्र गाडगीळ, श्री. चेतन देशमुख हे रसिक नव्याने सहभाग देत आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत.
स्वातन्त्र्यदिनाबरोबरच श्रावणापासून सुरू होणाऱ्या सर्व सणांच्या मालिकेत आपणा सर्वांना आकंठ आनंदाचा लाभ होवो हीच सदीच्छा.
सदाफ़ुलीचा नवीन अवतार कसा वाटला ते अवश्य कळवा.
शुभास्ते पन्थान:
|
[email protected]
सदाफ़ुली याहू! ग्रूपमधे सामील व्हा
![]()