|
|
|
' इच्छामृत्यू एक वरदान'दीपिका जोशी 'संध्या'
कधी कधी गंभीर विषयावरही मनांतले काही बोलून दाखवावेसे वाटते. इच्छामृत्यू एक वरदान हा पण विषय तसाच आहे. चर्चेचा विषय असून किंवा त्यावर खोलवर दृष्टी सगळयांचीच जावी अथवा विचार व्हावा असे वाटत असूनही काही इलाज नसल्याने पुढे कोणीच धजावत नाहीत. वैद्यकीय नियमांत किंवा आपल्या संविधानात अशा प्रकारचा काही नियम नाही. सुलभ मृत्यूची इच्छा प्रत्येक प्राणीमात्र बाळगून आहे. पण कोणाच्या नशिबाचे ह्या बाबतीत दार उघडेल हे सगळे अंधारातच आहे. समाजात किती तरी प्रकारचे लोक आहेत - गरीब आणि श्रीमंत. असे पण काही ज्यांना संपूर्ण आयुष्यभर काही न काही तरी त्रास भोगावा लागतो , हाडाची काडे करून एका हातावर मिळविणे आणि दुसऱ्या हातावर खाणे हा एक वर्ग तर ऐश्वर्यात लोळणारा- कष्टाची झळ न पोहोचणारा दुसरा वर्ग, पण शेवटी जीवन हे सगळयांचेच आहे आणि जगायचेच आहे. प्रत्येक माणूस जगतोच आहे.
जीवन सुरू झाले तर अंत निश्चित आहे, पण सुलभ होवो ही मनीषा. आपण आपळया आजूबाजूला असे किती तरी जीव बघतो जे जगताहेत पण बघणाऱ्यांचे काळीज पिळवटून निघते व आपसूकच मनांत का होईना पण देवा ह्याला सोडव रे बाबा असे आपण म्हटळयाशिवाय रहात नाही. इतक्या यातना, इतके शरीराला कष्ट मृत्यूजवळ तर जवळपास पोहोचलेलेच असतात पण त्याला हात लावू शकत नाहीत. अशा लोकांसाठी इच्छामृत्यू एक वरदानच ठरेल. ह्या संदर्भात फादर लुई वेदरहेड ने म्हंटले होते, ''असाध्य रोगांनी ग्रासलेळया, शरीराची बरीचशी इंद्रियांनी काम करण्यास नाकारलेळया जीवाला कृत्रिम मशीन लावून त्याच्या इच्छेविरूध्द त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव शिक्षा का देत नाही.'' आणि हे लोक म्हणजे डॉक्टर्सच नं! पण जर त्यांनी जीव वाचविण्याची शपथ घेतली आहे तर ते जीव कसा घेणार हो!
हे सगळे नजरेसमोर ठेवता इच्छामृत्यू चा कायदा किती महत्वपूर्ण आहे आणि त्यावर विचार केला जाणे जरूरी आहे हे ठळकपणे जाणवू लागले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली मते सांगण्याचा आणि स्वयंनिर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कुणी जर आपळया शारीरिक त्रासदींना कंटाळून तो असे जाहिरपत्र लिहून देत असेल - ''जर डॉक्टरांच्या मते आता ह्यापुढे मला ह्या शारीरिक यातनांपासून मुक्ती मिळू शकणार नसेल तर अश्या दुर्भाग्यपूर्ण अवस्थेमधे कृत्रिम उपचारांवर परावलंबी आणि लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा मला इच्छामृत्यू देऊन मुक्ती द्यावी'' तर अशा इच्छामृत्यपत्राचा आदर केला गेला पाहिजे. इच्छामृत्यू एक वरदान सिध्द होऊ शकते असे फक्त म्हणून काय उपयोगाचे? ह्या म्हणवळया जाणाऱ्या वरदानाला जगात कुठेही मान्यता मिळालेली नाहीये. इच्छामृत्यू वा दयामृत्यू हा सध्या एक मोठा वादाचा विषय होऊन बसला आहे. विषयाच्या बाजूने आणि विरूध्द वाद सुरूच आहे.
आजारपणांत रोग्याचा त्रास दूर करण्यात प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील असतोच. असेच एक डॉक्टर आहेत ऑस्ट्रेलियाचे डॉ.फिलिप. त्यांच्या मते जर उपलब्ध डॉक्टरी उपाय रोगीच्या वेदना कमी करण्यात सक्षम नसतील आणि मृत्यू हा अखेरचाच उपाय डॉक्टरांच्या नजरेसमोर असेल तर त्या जीवघेण्या (पण लवकर न संपणाऱ्या) वेदना सहन करत राहण्यापेक्षा व मृत्यूची वाट बघत बसण्यापेक्षा त्या रोग्याला सुखद मृत्यू देण्यात यावा. त्यांचे ह्या बाबतीत प्रयत्न सुरू आहेतच. खूप विरोध सहन करावा लागत असतांना पण ते आपळया ह्या मताशी चिकटून आहेत. इच्छामृत्यू किंवा दयामृत्यू , ह्याचा ते इतक्या प्रखरतेने प्रचार करत आहेत की ऑस्ट्रेलिया मधे त्यांना डॉ ड़ेथ ह्याच नावाने आता सगळे ओळखू लागले आहेत.
ह्या इच्छामृत्यू साठी तत्काळ मृत्य यावा म्हणून त्यांनी एक खास मशीन डेथ मशीन पण बनविली आहे. ते कायद्याच्या विरूध्द तर जाऊ शकत नाहीत पण त्यावर पर्याय शोधण्याच्या मागे मात्र जरूर आहेत. आंतर्राष्ट्रीय समुद्रात जहाजावर इच्छामृत्यू देणे व येथे ऑस्ट्रेलियन कायद्याला चालू न देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना पक्का विश्वास आहे की त्यांना यश नक्कीच मिळेल. त्यांनी असा पण दावा केला आहे कि त्यांना आजपर्यंत 200 हून अधिक लोकांनी इच्छामृत्यू मागितला आहे.
तीव्र वेदना सहन करणाऱ्या व्यक्तिची अशी इच्छामृत्यूची विनवणी समोरच्या माणसाला हलवून सोडते. जर सगळयांनी ह्या विषयावर थोडा जरी विचार करायला सुरूवात केली तरी कदाचित काही पर्याय शोधता येईल. प्रजासत्ताक देशात जेंव्हा सत्तापक्ष असा सामाजिक क्रांति घडवून आणणारा प्रस्ताव आणतो तेंव्हा विरूध्द पक्षाकडून तो हाणून पाडला जातो. भारतासारख्या परंपरावादी देशात असे कायदे लागू होण्याची शाश्वती वाटत नाही. असा कायदा कदाचित लागू होणे अशक्य असेल पण रोगी स्वतः जर का ही इच्छा व्यक्त करत असेल आणि त्याच्या यातना बघवत नाहीत असे म्हणणाऱ्या त्याच्या कुटुंबातील लोकांचे त्याला सहकार्य मिळाले तरच हे काही प्रमाणात शक्य होऊ शकते. पण कितीही झाले तरी कुटुंबातील सदस्य कधी ह्याला तयार होतील ? इच्छामृत्यू ह्या विषयाची दूसरी बाजू अशी पण आहे की डॉक्टर जेंव्हा पूर्णपणे रोगीच्या बाबतीत हताश आहेत तेंव्हा ते स्वतः रोग्याच्या बाजूने उभे राहू शकतात. असह्य वेदनेतला रोगी सोप्या मृत्यूला जवळ करू शकतो. इच्छामृत्यू आणि सहज सोपा मृत्यू, ह्यासाठी रोग्याला मदत करण्याला रोग्याचा जीव घेणे असे म्हणू शकत नाही. सेवाधर्म ह्या डॉक्टरांनी सोडून दिला आहे असा विचार करणे पण बरोबर नाही.
बऱ्याच वेळा जन्मतःच असे रोगी असतात जे मानसिक व शारीरिक दृष्टया लाचार असतात. समाज किंवा कुटुंबातील व्यक्ति त्यांना परावलंबी व बोझा समजत नसतील पण , पण ही सत्यपरिस्थिति आहे. ह्या लोकांना ही समज पण नसते. अशा व्यक्तिंसाठी डॉक्टर व कुटुंबातील सदस्य ह्यावर निर्णय घेऊ शकतात.
नीदरलैंडमधे अश्या इच्छामृत्यूला सुरूवात झाली आहे. ह्याचबरोबर जेंव्हा नुकतेच जन्मलेले बाळ बऱ्याच गोष्टींची कमी घेऊन जन्मले असेल व पूढचे आयुष्य त्याचे अंधारात आणि खूपच भयावह असेल तर त्याला पण असा मृत्यू देऊ शकतो. फक्त सगळयांचा सह्योग इथे पण आवश्यक असतोच. डॉ. केव्होरकीयनने पण अमेरिकेत 80 च्या वर अशा प्रकारच्या लोकांना मृत्यू देण्यात मदत केली आहे पण त्यांना आवश्यकतेनुसार सह्योग प्राप्त झाला होता हे विशेष. इच्छामृत्यू व तो ही एकदम कमी त्रासाचा व ताबडतोब मिळवून देणाऱ्या पध्दतींवर अधिक जोर दिला जातो.काही रोगी असे असतात जे आपळया इच्छाशक्ति आणि आत्मशक्तिच्या जोरावर ओढवणारे कुठलेही दुःख झेलायला तयार असतात पण काही असा वर्ग आहे जो आजाराचे नाव व तीव्रता समजताच हातपाय गाळू लागतात. अशा निराशावादी लोकांना पण जीवनाचा अंत करण्याचा हा एक पर्याय आहे.
तसे बघितले तर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की असा मृत्यू कोणाला देणे सोपे काम नाही. पण रोग्याची एक सारखी इच्छामृत्यूची इच्छा , डॉक्टरांची सहमती आणि कुटुंबाचा सह्योग असला तर इच्छामृत्यू सफल होऊ शकतो. आता हेच बघायला हवे की इच्छामृत्यू न्यायिक सम्मति मिळून हा व्यवहारात येऊ शकतो का?
दीपिका जोशी 'संध्या' इंटरनेटवरील 'अभि-अनु' या हिन्दी साप्ताहिकाच्या सहसंपादिका आहेत. |
[email protected]
सदाफ़ुली याहू! ग्रूपमधे सामील व्हा
![]()