भुमिका

नमस्कार,

महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया आपले सहर्ष स्वागत करत आहे. दार ए सलाम मध्ये मराठी परिवार गणेश उत्सवाच्या माध्यमातुन, मागील अनेक वर्षे एकत्र येतो आहे.

 

आपल्या मायदेशापासुन दुर अथांग समुद्रा पलीकडे, स्वताःचे घर आणि गणगोत दुर सोडुन,आलेल्या छोटाशा मराठी समुदायाला परदेशात आपल्या 'अमृताही पैजा जिंके' अशा मराठी भाषेची, संस्कृतीची, जपलेल्या मुल्यांची अधिकच तिव्रतेने आठवण येणे स्वाभाविकच आहे.

'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' हे ब्रीद उरी बाळगुन सगळ्या मराठी जनांना एकत्र मराठी परिवारात गुंफ़ावे, घरपण मिळावे या दृष्टिने या वर्षी महाराष्ट्र मंडळा चे मोठ्या उत्साहात पुनरुज्जिवन आणि पुनर्रचना करण्यात आली.

 

येथे आलेला प्रत्येक मराठी जन आपल्या सोबत काही विशेष घे‌उन आलेला आहे,आर्थिक दृष्ट्या स्थिरावण्याच्या दिशेने प्रगतीपथावर आहे. एकत्रीत पणे समृद्ध मराठी भाषा व

साहित्याचा आस्वाद घ्यावा, गाणी, नृत्य, नाट्य, क्रिडा इत्यादी सांस्कृतीक

कार्यक्रमातुन विवीध सुप्त गुणांना उत्तेजन मिळावे.एकमेकांच्या आनंदात सह्भागी

व्हावे, अडी‌अडचणीत धावुन जावे.नव्याने येणाऱ्यांना येथील वातावरणात सहज सह्भागी

होता यावे, वापस जाणाऱ्यांचे वापस जाणे सुकर व्हावे.मुलांमध्ये भाषावृद्धी व्हावी

सांस्कृतीक मुल्यांची जपणुक व्हावी असा संकल्प आहे.

 

'दारमराठी' हे ईपान(वेबपेज) महाराष्ट्र मंडळ,दार ए सलामचे इंटरनेट च्या महाजालात

प्रतिनिधीत्व करावे. सभासदांमध्ये संपर्क, संवाद, माहितीची देवाण-घेवाण सुलभ करणे,

विवीध कार्यक्रमांची माहिती देणे, घटनांची नोंद ठेवणे,व मुलांचे मराठीपण जपण्यात पालकांना उपयुक्त मदत करणे. हे उद्देश पुर्ण करण्यात सर्वांचा क्रियाशील सहभाग अभिप्रेत आहे.

यात सर्व मराठी जनाने आपपरभाव दुर ठेवुन निःसंकोचपणे सह्भागी व्हावे, आणि एकमेकांचा

आनंद द्विगुणीत करावा ही नम्र विनंती.

 

महाराष्ट्र मंडळ,दार ए सलाम,टांझानिया करीता-

 

कार्यकारी समिती व समस्त मराठी परिवार

 

 

 

Hosted by www.Geocities.ws

1