ठावकीच नाह

 -- लीनमेहेंदळ

    एक छोटासाच प्रश्न, पण त्यानभलमोठअंधार उजेडात आणला. हा अंधार आहअज्ञानाचअस कुणालवाटेल. छे, छे. हा अज्ञान आहकृतध्नतेचा. हा अंधार आहबेदरकारपणाचा. हा आहमूल्यशून्यतेचा. निरुत्साहाचा, शिकणार नाही, सुधारणार नाही या वृत्तीचा. ग्लोबलायझेशनच्यजमान्यांत राष्ट्रमूल्य हरवून बसलेल्यांचा.

    की ही पराकोटीचसत्यवदितम्हणायची? ठावकनव्हते ना - मग सांगून टाकले की ठावकनाहम्हणून. फायलपाहिल्या - त्य&ांत दिसलनाही. मग सांगून टाकले की दिसत नाही. तर त्यांत कांय चूक?

    आपल्याकडटोचणी, बोचणी, असकांहप्रकार असतो कां हो ? कांहगोष्टअशआहेत की ज्यफायलीत नसल्यतरत्यनाहीत हे लिहितांनपेन गळून पडलपाहिजे.

    करोडपतिमध्यप्रश्न विचारा - बिडजलायलकुणलिहिले - लाख<लोकांच्यकंठातून चालीवर नाचत - थिरकत उत्तर मिळेल. पुढचप्रश्न विचारा - एक कोटरुपयांसाठी - 'जय> हिंद' चा नारा या देशांत कुणआणला? एकजात सगळकरोडपतिच्यस्क्रीन वरून पळ काढतील. होय ना? मग फायलींचकांय दोष ? जे केबीसीलठावकनाही ते फायलींनकसठावकअसणार?

    कांहजुन्यपठडीतील लोक आहेत. त्यांच्यज्ञानानुभावासहित असलेल्यहेकेखोरपणालहिणवण्यासाठहिंदीत शब्द आहे - बूढ<उल्लू, तर इंग्रजीत आहबँडीकूट ! अशकांहलोकांनकान टवकारले, मान उंचावली, डोळयांच्यपापण्यांचउघडमीट केलआणि आपल्यम्हाता-या घोग-या आवाजात सांगून टाकले - ते होते ना ! आधआयसीएस्‌ ची परिक्षपास होऊनहत्यनोकरीलझटकून टाकून देशासाठदेशांत परत आलहोते.

    ते होते ना ! कलकत्तम्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्यआधमुख्य कार्यकारअधिकारआणि १९३१ मेयर झालतोवर त्यांचराजकीय कारकीर्द सुरझालहोती.

    ते होते ना ! कांग्रेसचऍक्टिव्ह सदस्य तर होतेच - पण स्वातंत्र्यलढजोर धरलागलतेंव्हझालेल्या १९३७ च्यइंडियन नॅशनल कांग्रेसच्यकलकत्तअधिवेशनांत जवाहरलाल नेहरुंच्यखांद्यालखांदलावून मिरवणूकीच्यअग्रभागहोते. त्यभव्य मिरवणुकीचआयोजकहतेच होते. आणि नंतर १९३८ मधे इंडियन नॅशनल कांग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले.

    ते होते ना ! आमच्या इतिहासाच्या पुस्तकांत ते होते. त्यांना १९३९ मध्ये ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. तिथे केलेल्या उपोषणांत प्रकृति खालावली तेंव्हा ब्रिटीशांनी त्यांना सोडून दिले. पण हाऊस ऍरेस्ट मध्ये टाकले होते - त्यांनी आजारपणाचे सोंग घेऊन दाढी वाढवली - मग पठाणाचा वेष घेऊन पळ काढला. देशांतून निघून जाऊन - देशाला पारखे होऊन - पख्खुनिस्तान, काबुल मार्गे यूरोप गाठला. आणि स्वातंत्र्यलढयाची ध्वजा रोवली.

    त्या तुरुंगवासहाऊस ऍरेस्टचे कागदपत्र डी क्लास मध्ये टाकून दिले (म्हणजे किरकोळ फायली - ज्या एका वर्षानंतर नष्ट कराव्या असा फतवा आहे ) असे मला वाटत नाही. कारण ब्रिटिश राजवटीत तर नाहीच नाही, पण स्वातंत्र्यानंतरही १९६०-७० पर्यंत तरी त्या फायलींना डी करण्याची कुणाची हिंमत झाली नसणार. नंतर त्या फायली इतर गठ्ठयांखाली खोल खोल गाडल्या गेल्या असणार. त्यामुळे त्या नष्ट झाल्या असण्याची शक्यता फार कमी.

    ते होते ना ! अंदमान मधील रॉस आयलंड वर जेथे ते जपानी सैन्य घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढयाचे विजयी सेनापति बनून आले आणि तिरंगा फडकावला ती जागा स्मारक म्हणून जपली आहे - ते फायलींमध्ये आहे.

    ते होते ना ! 'चलो दिल्ली' म्हणत त्यांनी हिंदुस्तान्यांची आझाद हिंद फौज (मराठी भाषांतर - हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारी फौज) बर्मा मार्गे नागालँड मधील कोहिमा पर्यंत आणली. तिथे त्या लढाईत जे ब्रिटिश सैनिक मारले गेले त्यांचे स्मारक ब्रिटिशांनी उभारले - मग त्या स्मारकाच्या फायतील कुठेतरी ते असतीलच ना !

    ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेत लढणा-यांच्या विरुध्द खटले लावले तेंव्हा त्यांचे वकीलपत्र पंडित जवाहरलाल नेहरुंनी घेतले होते. त्याचे 'ब्रीफ' त्यांनी तयार केले असेलच ना ! त्यांत कांय युक्तिवाद मांडला होता - की ही आझाद हिंद सेना म्हणजे हिंदुस्तानला लुटायला आलेल्या चोर डाकू लुटारुंची टोळी होती ? कांय मुद्दे घेऊन केस चालवणार होते पंडितजी ? ज्यांनी देशासाठी प्राण तळहाती घेतले आहेत अशा वीरांची ही आझाद हिंद फौज आहे - हिंदुस्थान हे त्यांचे वतन आहे - अशा< हिंदुस्तानाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी - लढण&े हा प्रत्येक हिंदी

 

 

 

 

 

माणसाचा जन्मसिध्द अधिकार आहे - म्हणून त्यांचा लढा हा स्वातंत्र्यलढा आहे - म्हणून ते सर्व स्वातंत्र्यसैनिक आहेत - असा पंडितजींचा युक्तिवाद नव्हता कां ? हाही प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारता येईल.

    फायलींना हे कांहीच ठावकी नाही. म्हणूनच सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य सैनिक होते का या माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला - 'तसा; कोणताही पुरावा किंवा उल्लेख आमच्या फायलींमध्ये नाही' असे उत्तर देण्यांत आले.  म्हणून करोडपतिला प्रश्न - लाहोर कांग्रेसमध्ये 'संपूर्ण स्वराज्य' चा नारा कुणी दिला ? उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरुंनी ! म्हणजेच पंडितजींना ब्रिटिशांचे राज्य मंजूर नव्हते तर ! म्हणजेच त्याविरुध्द आजाद हिंद सेनेची स्थापना करणारे स्वातंत्र्य सैनिकच ठरतात. 

    देशाची स्वतःची अशी जी शाळा साखळी - म्ह&णजे केंद्रीय विद्यालये - त्य&ांनी मान्य करुन देशभर लागू केलेले - एनस&ीआरटीने आठवी - नववी दहावी साठी लिहून, छापून काढलेले बालभारती - वाचा. त्यांत एक कविता घातलीय्‌. तिच्या या दोन ओळी -

         आजानुबाहू उंची करके वे बोले

                 रक्त मुझे देना

         इसके बदले में भारत की

                 आजादी तुम मुझसे लेना

    मग आता फायली पुस्तकांना फतवा काढणार की पुस्तके फायलींना ?

    पण त्या आधी जास्त महत्वाचा प्रश्न ! सुओ मोटो (च्द्वदृ थ््रदृद्यद्व) नोंद घेणे म्हणजे कांय ते फायलींना ठावकी आहे कां?

--------------------ज््र-------------------

   

   

 

 

Hosted by www.Geocities.ws

1